मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून व अभिनव प्रवास योजनेतून आकारास आलेल्या ‘मोदी एक्स्प्रेस’ गणपती विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणत गणेशभक्तांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ मुंबईहून कोकणाच्या दिशेने सुस्साट रवाना झाली.
आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून सुरू करण्यात आलेली ही ‘मोदी एक्स्प्रेस’ सकाळी ११ वाजता कोकणाच्या दिशेने प्रवासास निघाली आणि चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. ‘गणपती बाप्पा मोरया…’चा जयघोष करत चाकरमानी गणेशभक्त कोकणात आपल्या गावच्या दिशेने मोठ्या आनंदात रवाना झाले.
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. त्यांची ही व्यथा जाणून व कोकणवासियांचा विचार करून आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांना आनंदाने आणि मोफत गावी जाता यावे यासाठी एक्स्प्रेसची खास व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी या ट्रेनसंदर्भात घोषणा केली होती. अखेर आज गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन ‘मोदी एक्स्प्रेस’ ने कोकणाकडे प्रवास सुरू केला.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…