मुंबई : राज्याचे मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. राठोड यांनी स्वत: ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मंत्री राठोड यांनी मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोरोनाची लक्षणे नसल्यामुळे ते घरीच क्वारंटाईन झाले आहेत. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू आहेत. याबाबत संजय राठोड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांनी मला लक्षणे नसल्यामुळे घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितलेले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती, असे ट्विट राठोड यांनी केले आहे. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची चाचणी करण्यास त्यांनी सांगितले आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…