आपच्या बैठकीला ९ आमदार गैरहजर

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आप आमदारांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला ९ आमदार गैरहजर होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचे सर्व आमदार महात्मा गांधींचं स्मारक असलेल्या राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी स्मारकाला वंदन केलं.


उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं कौतुक करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी मागच्या जन्मात चांगली कामं केली असतील, त्यामुळं आज मला मनीष सिसोदियांसारखा जोडीदार मिळाला. त्यांनी भाजपची ऑफर धुडकावून लावली. आता ते आमच्या (आप) आमदारांना पैसे देऊन भाजपमध्ये येण्याची ऑफर देत आहेत. मला माहिती मिळाली आहे की, भाजप प्रत्येक आप आमदाराला २० कोटी रुपयांमध्ये विकत घेत घेण्याचा प्रयत्न करत आहे.


केजरीवाल पुढं म्हणाले, "माझ्या एकाही आमदारानं त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही याचा मला आनंद आहे. मला दिल्लीतील जनतेला सांगायचं आहे की, तुम्ही एका प्रामाणिक पक्षाला मतदान केलंय. आम्ही मरु, पण देशातील जनतेची फसवणूक कधी करणार नाही."

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे