ना टोल, ना फास्ट टॅग, थेट बँकेतून होणार पैसे वजा : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांवर सूसाट वेगाने गाड्या धावतात, पण टोल नाका आल्यावर गाड्यांना वेग कमी करावाच लागतो. पण, आता या टोलपासून सुटका मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच देशभरातील महामार्गांवर असलेले सर्व टोल प्लाझा आणि फास्ट टॅग रद्द करणार आहेत. ही योजना राबवण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा हटवण्याच्या योजनेवर सरकार वेगाने काम करत आहे. ही योजना लागू झाल्यानंतर कॅमेऱ्यातून वाहनांच्या नंबर प्लेटचा फोटो क्लिक केला जाईल आणि थेट त्यांच्या बँक खात्यातून टोलचे पैसे कापले जातील.


२३ ऑगस्ट २०२२ रोजी नवी दिल्लीतील एफआयसीसीआय फेडरेशन हाऊस येथे अॅक्सीलेरटींग द रोड इन्फ्रास्ट्रक्चर न्यू इंडिया ‘७५ या रोड अँड हायवे समिटच्या तिसऱ्या आवृत्तीदरम्यान ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, ‘पूर्वी लोक आपल्या गाडीला फॅंसी नंबर प्लेट बसवत असायचे, पण २०१९ मध्ये आम्ही एक नियम केला, ज्यानुसार कार कंपनी नंबर प्लेट बसवून देतील. यामुळे, महामार्गांवर लावलेल्या कॅमेऱ्याला नंबर प्लेटचा फोटो घेता येईल. टोल प्लाझाच्या जागी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे लावले जात आहेत, जे वाहनांच्या नंबर प्लेट्स वाचतील आणि वाहन मालकांच्या लिंक केलेल्या बँक खात्यांमधून टोल कपात करतील. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. मात्र, टोल प्लाझावर टोल न भरणाऱ्या वाहनधारकाला शिक्षेची तरतूद अद्याप कायद्यात नाही, ही मोठी अडचण आहे. यासाठी लवकरच कायदा होऊ शकतो,’ अशी माहितीही गडकरी यांनी दिली.


ते पुढे म्हणाले की, ‘सध्या सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांच्या एकूण टोल वसुलीपैकी ९७ टक्के रक्कम फास्टॅगद्वारे केली जाते. उर्वरित ३% फास्ट टॅग वापरत नसल्यामुळे सामान्य टोल दरापेक्षा जास्त पैसे देतात. फास्ट टॅगसह टोल प्लाझा ओलांडण्यासाठी प्रत्येक वाहनाला अंदाजे ४७ सेकंद लागतात. सरकारी आकडेवारी पाहिल्यास, दर तासाला ११२ वाहने मॅन्युअल टोल कलेक्शन लेनमधून जातात. त्या तुलनेत २६० हून अधिक वाहने इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन लेनमधून दर तासाला टोल भरतात. पण जेव्हापासून फास्ट टॅगचा वापर सुरू झाला, तेव्हापासून देशभरातील टोलनाक्यांवरील वाहतूक सुलभ झाली आहे. मात्र त्यानंतरही देशातील अनेक टोलनाक्यांवर गर्दी होते.’


‘फास्ट टॅगमध्ये काही समस्या आहेत. उदाहरणार्थ, टॅगमध्ये पैसे कमी असलेले लोक लेनमध्ये येतात आणि पैसे न कटल्यामुळे उशीर होतो. यासोबतच दूरवरच्या टोल प्लाझावर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. यामुळे प्लाझा सर्व्हर कमी शिल्लक असलेला फास्ट टॅग वेळेत अॅक्टिव्ह करू शकत नाही. याशिवाय, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन रीडर आणि टॅग झीज यांसारख्या समस्या तसेच फास्ट टॅग वापरणारे लोक चुकीच्या पद्धतीने वापरतात, अशा अनेक समस्या येतात. पण, या नवीन नंबर प्लेट रीडरमुळे ही समस्या दूर होऊ शकते. यावर सध्या काम सुरू आहे, लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल,’ अशी माहिती गडकरींनी दिली.

Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा