अशोक पाटील अखेर शिंदे गटात सामील!

मुंबई (वार्ताहर) : ठाकरे गटातील गळती काही थांबण्याचे नाव नाही. भांडुपचे माजी आमदार अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. शेकडोहून अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना घेऊन अशोक पाटील हे शिंदे गटात सामील झाले. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला बसलेल्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे.


गेल्या काही दिवसांपासून अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुपमध्ये सुरू होती. भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. 'शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू! अशी धमकी जेव्हा दिली जाते, त्यामुळे व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतला आहे. "जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील "तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी," असा आव्हानात्मक निर्वाणीचा इशारा अशोक पाटील यांनी दिला.


यावेळी, ईशान्य मुंबई विभाग संघटिका संध्या वढावकर, माजी नगरसेविका मीनाक्षी अशोक पाटील, महिला उपविभाग संघटिका राजश्री राजन मांदविलकर, महिला शाखा संघटक सुरेखा पांचाळ, माजी शाखाप्रमुख कृष्णा शेलार, माजी शाखाप्रमुख विजय परब, उपशाखाप्रमुख संजय दुडे, अनंत जाधव, अविनाश बागुल, नितीन शिंदे, अंकुश करांडे, जगदीश शेट्टी, उदय महाडिक, संजय शिंदे, रमेश टक्के, अलका सावंत, सोनल गिरी, आशा साळवी, शितल बडदे, माधुरी वाघेला, नंदा वाघेला या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी अशोक पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

Comments
Add Comment

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)