अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबन होणार रद्द!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबन लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. एआयएफएफच्या दैनंदिन व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेली तीन सदस्यीय प्रशासकीय समिती (सीओए) न्यायालयाने रद्द केली आहे. सोमवारी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात फिफाने भारतावर लादलेले निलंबन उठवण्यासाठी निश्चित केलेल्या प्रमुख निकषाची पूर्तता झाली आहे.


न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपल्या तोंडी आदेशात म्हटले, “एआयएफएफचे दैनंदिन व्यवस्थापनाचे काम केवळ कार्यकारी महासचिव यांच्या नेतृत्वाखालील एआयएफएफ प्रशासनाद्वारे पाहिले जाईल.” याशिवाय, न्यायालयाने एआयएफएफ निवडणुकांची तारीख देखील एक आठवडा पुढे ढकलली आहे. २८ ऑगस्ट रोजी एआयएफएफ निवडणूक होणार होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक मतदार यादीमध्ये केवळ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३६ सदस्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.


सुनावणीदरम्यान, सीओएचे वकील गोपाल शंकरनारायण यांनी डेलॉइटने सीओएकडे सादर केलेला एआयएफएफचा अंतरिम ऑडिट अहवाल न्यायालयाला दिला. “याबाबत आणखी एक अंतिम अहवाल आम्ही मागितला आहे,” असे ते म्हणाले. सीओएकने अंतिम अहवाल सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे उत्तर त्यावर न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फिफा लवकरच एआयएफएफवरील निलंबनाची कारवाई मागे घेईल अशी शक्यता आहे.

Comments
Add Comment

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून