मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना पहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या हजारच्या जवळ पोहचताना पाहायला मिळत आहे. सध्या सणांच्या कालावधीत मुंबईतील बाजारांत खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा दिवसभरातील नव्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांसोबतच पालिकेचीही चिंता वाढली आहे.
बुधवारी मुंबईत ९७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ५,१९४ एवढी आहे. दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८५० आहे. कोविड आणि इतर आजारामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेले काही दिवस कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत असल्याने चिंता वाढली आहे.
बरे झालेल्या रुग्णांचा दर कमी होत असून ९७.८ टक्के झाला आहे तर कोविड वाढीचा तर ०.०६३ टक्के झाला आहे. कोविड दुप्पटीचा कालावधी १०८८ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत सणांचे दिवस असून गर्दी न करता काळजी घेण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…