चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

  159

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. तसेच अधिवेशनात काय मुद्दे मांडणार हेही त्यांनी सांगितले.


ज्या पद्धतीने सरकार सत्तेवर आले ते अद्याप विधीमान्य नाही. शिंदे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरेच्या चिंधड्या उडवत स्थापन झाले आहे. सर्वोच्च न्यायालयात या सरकारच्या भवितव्याबाबक प्रलंबित असून त्यावर काहीही निकाल लागला नाही. त्यातच अधिवेशन कमी कालावधीचे आहे. आम्ही दहा दिवस अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर विचार करू, असे सांगण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले.


एकंदरीतच अतिवृष्टी झाली आहे. वैणगंगा नदीला पूर आला असून भंडारा, गोंदीयामधील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ज्याप्रकारे मदत व्हायला हवी होती, ती शेतकऱ्यांना मदत झाली नाही. हे मुद्दे आम्ही अधिवेशनात मांडणार आहोत. अतिवृष्टी ग्रस्तांच्या मागण्या आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ७५ आण बागायतीसाठी दीड लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. अतिवृष्टी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता