Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीकणकवलीत नितेश राणे यांच्या उपस्थितीत ७५ फूट उंचीवर फडकला तिरंगा

कणकवलीत नितेश राणे यांच्या उपस्थितीत ७५ फूट उंचीवर फडकला तिरंगा

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण...!

कणकवली (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त कणकवली तहसीलदार कार्यालय येथे ७५ फूट उंचीचा स्तंभ उभारण्यात आला आहे. हा ध्वजस्तंभ संपूर्ण जिल्हाभर तसेच इतर जिल्ह्यांचा बाबतीत सर्वात उंच असल्याने लक्षवेधी ठरत असून आज स्वातंत्र्यदिनी तसेच ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा दिवशी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी कणकवली तहसीलदार आर जे पवार, आमदार नितेश राणे, कणकवली पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले, ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, नायब तहसीलदार राठोड, तानाजी रासम, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, तसेच तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांतील अधिकारी कर्मचारी, सर्व शाळा महाविद्यालयांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच देश प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिरंगा फडकवताना सर्वांच्याच माना साधारणपणे ७५ फूट उंचीच्या टोकापर्यंत उंचावल्या होत्या. त्याचवेळी ध्वजस्तंभ उभारणीसाठी मेहनत घेणारे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार आर जे पवार यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले. हीच खरी त्यांच्या कार्यकर्तृत्ववाची पोचपावती असल्याचे आम. नितेश राणे यांनी दिली. एवढे अधिकारी पाहिले मात्र तहसीलदार आर. जे. पवार यांच्यासारखे कर्तव्यदक्ष आणि ७५ फूट उंच ध्वजस्तंभाची संकल्पना आखून ती प्रत्यक्षात उतरवणारे तहसीलदार आमच्या कणकवली तालुक्याला लाभले हे आम्हा कणकवलीवासीयांचे भाग्य असेही आम. नितेश राणे यांनी तहसीलदार आर जे पवार यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. तहसीलदार आर जे पवार यांच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -