मुंबई : आज मुंबईत ५८४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४०७ कोरोनावर मात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ११,०८,२९० वर पोहोचली आहे. तर मागील २४ तासांत शून्य रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १९,६६४ झाली आहे.
उद्या कोविड लसीकरण बंद
मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर उद्या मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी ‘पतेती’ हा पारशी बांधवांचा सण असून सार्वजनिक सुटी राहणार आहे. त्यामुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. बुधवार, दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहील. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील रुग्णसंख्या
राज्यात आज ११८९ कोरोना रुग्णांची नोंद तर एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७९,१३,२०९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण १२१४८ सक्रिय रुग्ण आहेत.
देशातील रुग्णसंख्या
देशात रविवारी दिवसभरात १४ हजार ९१७ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या ८२५ रुग्णांची वाढ झाली आहे. याआधी म्हणजे शनिवारी १४,०९२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात १ लाख १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात १ लाख १७ हजार ५०८ कोरोना रुग्ण आहेत.