चिपी विमानतळावरून आणखी एक विमान प्रवाशांना सेवा देणार

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून प्रवाशांना सेवा देणारे आणखीन एक विमान असावे, अशी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केलेली मागणी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पूर्ण केली आहे.


एअरलाइन्सच्या आणखीन एका विमानाला मुंबई ते चिपी व चिपी विमानतळावरून पुन्हा मुंबई अशा सायंकाळच्या सत्रातील प्रवासाला मंजुरी दिली आहे. आमदार नितेश राणे यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे एका दिवसात दोन विमानांची सेवा सिंधुदुर्गवासीयांना मिळणार आहे. ही विमान सेवा १८ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत स्वतः आमदार नितेश राणे यांनी दिली.


चिपी विमानतळावर १८ ऑगस्टपासून दुसरे विमान सुरू करण्यास केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मान्यता दिली आहे. यात १८ ऑगस्टपासून सायंकाळी ३ वाजता मुंबई हुन हे विमान सुटेल आणि ४.२० वाजता ते विमान सिंधुदुर्ग चिपी विमानतळावर लँडिंग होईल, तर पुन्हा सायंकाळी ४.४५ वाजता ते विमान चीपी विमानतळ येथून टेक ऑफ होऊन ६.२० वाजता मुंबईला लँडिंग होणार आहे.


हे विमान एका वेळी सत्तर प्रवाशांची ने-आण करणार आहे. गणेश चतुर्थीसाठी, कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना ही एक सुवर्णसंधी देण्यात आली असून, चाकरमान्यांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तूर्तास गणेशोत्सवासाठी ही नवीन विमान सेवा सुरू केले आहे; परंतु येत्या काळात ही विमान सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.


दरम्यान आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, त्याचप्रमाणे एअरलाइन्सचे विरेंद्र म्हैसकर, किरण तसेच मुंबईत हे स्पेशल विमान पार्किंग करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अदानी कंपनी आणि त्यांचे डायरेक्टर, व अधिकारी या सर्वांचे आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

T - 20 world Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्रांचा साठा वेगाने घटत असल्यामुळे अमेरिका चिंतेत

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका आणि इस्रायल यांनी संयु्क्तपणे २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराणवर हवाई हल्ले सुरू केले. आज ४

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

Israel - Iran War : चर्चेसाठी खूप उशीर झाला; आता माघार नाही - डोनाल्ड ट्रम्प

इराणवर इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प