ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेम, पण शिरसाट कॅबिनेट मंत्रीपदाच्या मागणीवर ठाम

  43

औरंगाबाद : राजकारणात सगळ्यांनाच पुढे जायचे असते. त्यामुळे मंत्री व्हावे, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे, ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबरच आहे आणि त्यांच्यासोबच राहणार असल्याचेही शिरसाट म्हणाले. काल गेलेली पोस्ट चुकून गेली होती. माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती पोस्ट गेल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला.


काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केले होते. ज्यात 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतच विधानसभेतले उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील त्यांनी जोडले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचे भाषण ट्वीट करत शिंदे गटाला इशारा तर दिला नाही ना, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. मंत्रीपद मिळाले नसल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.


दरम्यान, ठाकरे कुटुंबाबद्दल अपशब्द निघणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, टीका केली तर उत्तर मिळणार असल्याचेही शिरसाट यावेळी म्हणाले.

Comments
Add Comment

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,

मोठी बातमी : देवा विठ्ठला काय हे! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता दौंड : आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण