मुंबई : मुंबईच्या माहीम येथील दर्ग्यात दर्शन घेण्यासाठी आलेले दोन तरूण मिठी नदीत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्री माहीम खाडीवर उभे असताना एका मित्राचा पाय घसरल्याने तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने धाव घेतली असता तोही वाहून गेला. मध्यरात्री भरती असल्याने अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आले नाही. मात्र पाणी ओसरताच एकाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. जावेद आणि आसिफ अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
कुर्ला येथील दोन तरुण जावेद आणि आसिफ माहीम दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते. दर्शन झाल्यावर दोघेही मध्यरात्री घरी जात असताना शौचाला जाण्यासाठी दोघेही माहिमच्या खाडीवर गेले. त्यावेळी दोघांपैकी एकाचा पाय घसरला आणि तो खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने खाडीत उडी घेतली, पण तो देखील बुडाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. पण मध्यरात्री मुंबईत मुसळधार पाऊस होता. तसेच भरती होती. मध्यरात्री भरती असल्याने अग्निशमन दलाला बचाव कार्य करता आले नाही. मात्र पहाटे पाणी ओसरताच एका तरुणाचा मृतदेह किनाऱ्यालगत आढळून आला. तर दुसऱ्या मित्राचा शोध अद्याप सुरुच आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…