काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा परिसराची ओळख असून नागरिक, पर्यटकांची या भागात नेहमीच वर्दळ असते. दरवर्षी भरविला जाणारा काळा घोडा कला महोत्सव या परिसराची सांस्कृतिक ओळख आहे. हा परिसर युनेस्कोच्या ‘व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको आसम्बल ऑफ मुंबई’ या जागतिक वारसा स्थळाला लागूनच असल्यामुळे मुंबईकर नागरिक तसेच पर्यटकांना 'हेरिटेज वॉक'चा आनंद घेता यावा, या उद्देशाने काळा घोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग/फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या पाच रस्त्यांचे सुशोभीकरण महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.



दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसरातील डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, रुदरफोर्ड मार्ग आणि बी. भरूचा मार्ग येथे सुरू असलेले सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण ३ हजार ४४३ चौरस मीटर क्षेत्रफळावर (एकूण लांबी ५०० मीटर) सुशोभीकरण करण्यात येत आहे. सुशोभीकरणानंतर मुंबईकरांसह, देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा परिसर खुला करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या सुशोभीकरण कामांचा मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, माजी मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन गुरुवारी ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी आढावा घेतला. सहायक आयुक्त (ए विभाग) जयदीप मोरे, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


प्रत्येक पर्यटकाच्या मुंबईतील स्थळभेटींच्या यादीत काळा घोडा परिसराचे नाव असते. मुळातच नितांत सुंदर असलेल्या या परिसरात खमंग पदार्थांचे विविध उपाहारगृहे (रेस्टॉरंट), भोजनालये/विश्रांतीगृह (हॉटेल्स्) आभुषणांची दालने, वस्रांची दालने आहेत. या परिसरात फेरफटका मारताना, खरेदी करताना, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतांना पर्यटकांना इतर सुविधाही पुरविण्यासाठी महानगरपालिकेने सुशोभीकरणाची कामे हातात घेतली आहे. परिसरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या परिसराच्या चारही बाजूंना अद्ययावत बॅरिकेटस् लावण्यात येणार आहेत. बी. भरूचा मार्गावरील चौकात ‘प्लाझा’ साकारण्यात येणार आहे. करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा यासाठी वापर करण्यात आला आहे. या प्लाझाजवळ टेबल-खुर्चीवर बसून मुंबईकर, पर्यटक या परिसराचा, येथील स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेवू शकणार आहेत. तसेच संपूर्ण परिसरात पर्यटकांना सुखावणाऱ्या वळणदार पायवाटाही साकारण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांचा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तथा प्रशासक यांनी आढावा घेतला. हा परिसर अधिकाधिक सुंदर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच या ठिकाणचे प्रत्येक उपहारगृह, भोजनालय दालने पाट्या या एकसारख्या आकाराच्या आणि नियमात असायला हव्यात, अशा सूचना गगराणी यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य