
आनंद (गुजरात) : गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील सोजित्राजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, ४ जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले ३ जण एकाच कुटुंबातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कार काँग्रेस आमदार केतन पादियार यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. केतन पादियार हे काँग्रेसच्या आमदार पूनमभाई परमान यांचे जावई आहेत. सध्या पोलिसांनी आमदार जावईविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमदार जावयाला अटक केली आहे. पोलिसांनी काँग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1557849627344322560
या प्रकरणाची माहिती देताना आनंदचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. कार, बाईक आणि ऑटो रिक्षा यांच्यात भीषण टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ऑटोमधील चार आणि दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला. तर, कार चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.