मुंबई : यंदाची ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही थीम समोर ठेवून, मुंबई मेट्रो वनने स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनी, गणवेश परिधान केलेले शालेय विद्यार्थी मेट्रोचा मोफत प्रवास करू शकतील.
मुंबई मेट्रो वनने दररोज ७४ कोटी प्रवासी प्रवास करतात. मेट्रो वनला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो राईड देण्यासोबतच, मुंबई मेट्रो वनने हर घर तिरंगा या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्या शिवाय मेट्रो १मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.