Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीभुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटात दरड कोसळून रस्ता तुटून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारीच्या सुमारास घडली आहे. दरड कोसळल्यामुळे घाटात दोन्हीही बाजूला काही वाहने अडकून पडली होती. जे.सी.बी.च्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. दरडीमुळे रस्ता तुटल्यामुळे घाटातील लवकर वाहतूक सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

तालुक्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. सह्याद्री परिसरात पडणाऱ्या पावसाने गगनबावड्यापासून मागे ४ कि.मी. अंतरावर भुईबावडा घाटात डोंगरातून भूसख्खलन झाल्यासारखी भल्ली मोठी दरड रस्त्यावर कोसळली आहे. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. ही दरड इतकी मोठी होती की या दरडीच्या दणक्याने घाटातील रस्ताच तुटून गेला आहे. दरड पडल्याची माहीती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.व्ही. जोशी व शाखा अभियंता कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने दरड हटविण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने सुरु करण्यात आले आहे. दरड हटविली तरी रस्ता दरडीमुळे रस्ता खचल्यामुळे वाहातूक लवकर सुरु होणे अवघड बनले आहे.

वैभववाडी तालुक्यातील करुळ व भुईबावडा हे दोन महत्वाचे घाटमार्ग आहेत. रविवारी करुळ घाटात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे घाटातील जड व अवजड वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. तर हलकी वाहातूक सुरु आहे. त्यामुळे सध्या भुईबावडा घाटातून जड वाहतूक सुरु होती. माञ भुईबावडा घाटातही दरड कोसळून रस्ता तुटल्यामुळे वैभववाडी तालुक्याचा कोल्हापूरशी असलेला थेट संपर्क तुटला आहे.

करुळ घाटमार्गे हलक्या वाहनांनाच परवानगी

करूळ घाट मार्गातून हलक्या वाहनांना ये- जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मोटरसायकल, कार, जीप व मिनी व्हॅन याच वाहनांना वाहतूकीस परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना दिले आहे.

करूळ घाटात दोन दिवसापूर्वी पायरी घाट नजीक संरक्षक भिंत कोसळली. भिंत व साईड पट्टीचा भाग कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. कोसळलेल्या ठिकाणी एकेरी वाहतुकीस संबंधीत विभागाने परवानगी दिली आहे. मात्र जड व अवजड वाहतूक या मार्गावरून बंदच रहाणार आहे. जड व अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -