मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील एकूण ८ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. सर्व बँकांनी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील ३ सहकारी बँकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, द यवतमाळ को ऑपरेटिव्ह बँक ली., वरुड को-ऑपरेटिव्ह बँक लि. या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयने सहकारी बँकांसाठी घालून दिलेले नियमांचे पालन न केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ७ लाख रुपयांचा दंड केला आहे. केवायसी संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ३.५० लाखांचा तर वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला १ लाख रुपयांचा दंड केला आहे.
महाराष्ट्रातील या तीन बँकांसोबतच गुजरातमधील मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ४० लाख रुपये, मध्य प्रदेशमधील जिल्हा सहकारी बँक, छत्तीसगडमधील राज्य सहकारी बँक, गुना येथील एका सहकारी तर पणजी येथील गोवा राज्या सहकारी बँकेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेवर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर आरबीआयने कारवाई केली होती.
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…
नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…
मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…