नागपूर : भूतबाधा झाल्याच्या संशयातून एका भोंदूबाबाने दिलेल्या सल्ल्यानुसार आपल्या पोटच्या मुलीची आई-वडिलांनी हत्या केल्याच्या घटनेने नागपूरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे.
नागपूरच्या सुभाषनगर भागात ही घटना घडली असून मागील काही दिवसांपासून तिच्या हावभावात बदल दिसून आल्यामुळे भोंदूबाबाकडून सल्ला घेण्यात आला होता. त्यानंतर तिला परवा रात्री जबर मारहाण करण्यात आली होती. लाथाबुक्क्या आणि बेल्टने मारल्यामुळे चिमुकलीला मार सहन न झाल्यामुळे ती निपचित पडली होती. त्यानंतर आईवडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पोलिसांनी सदर घटनेतील आरोपी असलेल्या आईवडिलांना आणि तिच्या मावशीला ताब्यात घेत अटक केली आहे. त्यानंतर सल्ला देणाऱ्या भोंदूबाबाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…