नितेश राणेंकडून गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस'ची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. यामुळेच एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होऊन जाते. एक्स्प्रेसचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. दरम्यान, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस धावणार आहे.


भाजपा आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. दादर ते कणकवली दरम्यान 'मोदी एक्स्प्रेस'ची घोषणा आमदार नीतेश राणे यांनी केली आहे. कोकणवासीयांना हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार असून, प्रवासादरम्यान एक वेळचे जेवण व त्यासोबत आरतीचे पुस्तक ही दिले जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. सलग दुसऱ्या वर्षी ही 'मोदी एक्सप्रेस' कोकणात जाणार आहे.


यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, काय मग गाववाल्यांनो गणपतीत गावाक जायचे की नाही? मग चला तयारीला लागा. चला मग भेटू २९ तारखेला. गणपती बाप्पा मोरया! नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे.


२९ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन तुमची हक्काची मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे’. ‘ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे. आरतीचे पुस्तकही देणार आहोत. सगळी तयारी झालेली आहे,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
तिकीटासाठी भाजपाच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे, असे नितेश राणेंनी सांगितले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुका अध्यक्षांना फोन करा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.


यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. कोकण वासियांसाठी गणपती हा खूप मोठा सण आहे. चाकरमानी कितीही व्यस्त असला तरी सर्व बाजूला सारून तो गणपतीत आपल्या गावाकडे जातो. परंतु, या दिवसांत बस असेल ट्रेन असेल यांचे बुकिंग भेटणे फार कठीण असते. त्याचबरोबर याचे दर सुद्धा अव्वाच्या सव्वा असतात. म्हणूनच ‘मोदी एक्सप्रेस' चा फायदा हा मागच्या वर्षीपासून मुंबईतील बरेच चाकरमानी घेत आले आहेत. यंदाही त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस