अविनाश भोसले, संजय छाब्रीयांवर ईडीची कारवाई

मुंबई : ईडीने पीएमएलए अंतर्गत येस बँक आणि डीएचएफएल फसवणूक प्रकरणात व्यावसायीक संजय छाब्रिया यांची 251 कोटी रुपयांची मालमत्ता आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांची 164 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. या प्रकरणात एकूण जप्ती 1,827 कोटी रुपयांवर पोहचली आहे, अशी माहिती ईडी अंमलबजावणी संचालक कार्यालयाकडून देण्यात आली.


ईडीने व्यावसायिक संजय छाब्रिया आणि ईडीच्या कस्टडीतील अविनाश भोसले यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त केली. भोसलेंचे मुंबईतील डुप्लेक्स फ्लॅट, छाब्रियांची सांताक्रुझमधील आणि बंगळुरुमधील जमीन तसेच सांताक्रुझमधील तीन कोटींचा फ्लॅट जप्त केला. आतापर्यंत ईडीने 1827 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. छाब्रियांवर यापूर्वी सीबीआयकडून कारवाई झाली होती.


पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआयचा आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून हि माहीती समोर आली आहे.


लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीत दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती.


या हाॅटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून सत्तर कोटी दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण सहाशे कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः तीनशे कोटींची रक्कम भरत व्यवहार ईमारत खरेदीसाठी केला होता.


हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशिल काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहेत, सध्या अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.


पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना डीएचएफएल आणि येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयने 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर त्यांना दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.


बीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणांची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे - मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने याआधी अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत