नवी दिल्ली : भारतीय नागरिकांचा डेटा चीनला पाठवत असल्याच्या प्रकरणात दिल्लीतील नोएडा येथून तीन चीनी नागरिकांना स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) कडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट भारतीय आधार कार्डही जप्त केले आहेत.
चेन जुनफेंग, लिऊ पेंगफेई आणि झांग किआओ असे अटक करण्यात आलेल्या चीनी नागरिकांची नावे असून ते हेरगिरी करत भारतीय नागरिकांचा डेटा चीनला पाठवत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत १७ लोकांना पकडण्यात आले आहे. ११ जून रोजी पकडण्यात आलेल्या लू लांग आणि युन हेलांग या दोघांच्या सखोल चौकशीनंतर या प्रकरणाचा खुलासा झाला होता. हे दोघेही अवैध पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे भारतात प्रवेश करत होते. त्यानंतर १३ जूनला पोलिसांनी सुफाई आणि त्याची प्रेयसी पेटेख रेनुआला अटक केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये ते भारतीयांची माहिती चीनमध्ये पाठवत असल्याची माहिती समोर आली होती. पण ते ही माहिती कोणत्या कारणासाठी चीनमध्ये पाठवत आहेत याची माहिती समोर आली नाही.
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरांचा वेलू अक्षरश: गगनावर गेला. वर्षभरातील किमतींची तुलना करता सोन्याने…
डॉ. सर्वेश सुहास सोमण आपण आपले डीमॅट खाते उघडून त्यात काही पैस टाकले की आपण…
- सुनील जावडेकर महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि कोकणातील पाच जिल्हे हे ७२० किलोमीटरच्या विस्तीर्ण अशा…