Saturday, January 18, 2025
Homeक्रीडावेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण; १९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने रचला इतिहास

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे

१९ वर्षांच्या जेरेमीने क्लीन अँड जर्क विभागात १६० किलो वजन उचलून एकूण ३०० किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. १६५ किलो वजन उचलण्याच्या अंतिम प्रयत्नाच्या शेवटी जेरेमीला दुखापत झाल्याने तो शेवटचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. असे असूनही त्याला सुवर्णपदावर आपले नाव कोरण्यात त्याला यश आले. सामोआचा अनुभवी लिफ्टर वैपावा इओनेने एकत्रित २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग उमोफियाने २९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.

मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय जेरेमीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे पहिलेच वर्ष आहे. त्याने२०१८मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

भारताच्या खात्यात पाचवे पदक भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पाच पदके पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणजे ही सर्व पदके वेटलिफ्टिंग मधून मिळाली आहेत. भारताने आतापर्यंत २ सुवर्ण, २ रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. महाराष्ट्रातील संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -