सीबीआयने जप्त केले अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर

  72

पुणे (हिं.स.) : डीएचएफएल घोटाळ्यात सहभागाचा आरोप असलेले उद्योगपती अविनाश भोसले यांच्या मालकीचे हेलिकॉप्टर शनिवारी सीबीआयने जप्त केले. येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यात अविनाश भोसलेंना २६ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.


युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या कन्सोर्टियमला ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या डीएचएफएलच्या घोटाळ्यात त्याचा सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. त्यांचे ऑगस्टा वेस्टलँडचे हेलिकॉप्टर आज सीबीआयकडून जप्त करण्यात आले. गेल्या २६ मे रोजी भोसलेंना अटक केल्यानंतर १० दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांचे खासगी हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.


भोसले यांच्या घरावर एप्रिल महिन्यातच सीबीआयने छापे घातले होते. तर मागील वर्षी "सीबीआय'ने त्यांची तब्बल ४०.३४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. मागील काही वर्षांपासून येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणाचा तपास "सीबीआय'कडून सुरु आहे. त्यांनी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे, तर विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावरही कारवाई केली आहे.दरम्यान, याच बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये भोसले यांचेही नाव पुढे आले होते. त्यानुसार, "सीबीआय'कडून भोसले यांचा तपास सुरु होता. भोसले यांचे घर व काही मालमत्तांवर एप्रिल महिन्यात सीबीआयने छापे टाकून मोठ्या प्रमाणात झाडाझडती घेतली होती.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक