Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पोलिस भरतीचा सराव करत असताना तरुणाचा मृत्यू

पोलिस भरतीचा सराव करत असताना तरुणाचा मृत्यू

हिंगोली : हिंगोली शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२८ जुलै) सकाळी घडली. संघपाल नरवाडे (२६, रा. वसमत) असे या तरुणाचे नाव आहे.

शहरात तरुण मंडळी मैदानी चाचणीचा सराव करत आहेत. शहरातील विविध ठिकाणी मैदानांवर सुमारे २०० ते २५० तरुण सराव करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

दरम्यान, वसमत येथील संघपाल नरवाडे हा देखील मागील काही दिवसांपासून हिंगोली शहरात राहून पोलिस भरतीची तयारी करीत होता. बार्टीअंतर्गत उदय चॅरिटेबल ट्रस्ट यांना या उमेदवारांना भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचे काम देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे संघपाल हा मित्रांसोबत मैदानावर धावण्याचा सराव करत होता. यावेळी अचानक तो खाली कोसळला. हिंगोलीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर त्याला शासकीय रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

Comments
Add Comment