महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर खा. रामदास तडस बिनविरोध

नवी दिल्ली (हिं.स.) : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा आता वर्धेतील भाजपचे खासदार रामदास तडस यांच्याकडे येणार आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी दोघांनी अपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे तडस यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार होते. काही दिवसांपासून या संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यानंतर भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली वार्षिक सर्वसाधारण बैठक झाली. यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोन जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून खा. रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे.


यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले होते. आम्ही १४ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते असे तोमर म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडत आहेत.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या