संरक्षण मंत्रालयाकडून २८,७३२ कोटींच्या शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी

  65

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने संरक्षण दलांसाठी २८ हजार ७३२ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीस मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेतील झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आलीय. त्यानुसार सशस्त्र ड्रोन, कार्बाइन आणि बुलेटप्रूफ जॅकेटच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.


संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आधुनिक युद्धात भारतीय सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी डीएसी द्वारे स्वायत्त पाळत ठेवण्यासाठी आणि सशस्त्र ड्रोनच्या स्वार्म्सच्या खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी १४ जलद गस्ती जहाजे घेण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या प्रस्तावालाही डीएसीने मंजुरी दिली आहे. यासोबतच नौदलाच्या १२५० किलोवॅट क्षमतेच्या मरीन गॅस टर्बाइन जनरेटरच्या अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली आहे.


चीनशी असलेल्या ‘लाईन ऑफ ऍच्युअल कंट्रोल’ (एलएसी) आणि पूर्व सीमेवर पारंपारिक, हायब्रीड युद्ध आणि आतंकवाद विरोधी कारवायांसाठी शस्त्रास्त्र खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच सैन्यासाठी ४ लाख क्लोज क्वार्टर बॅटल कार्बाइन्स मंजूर करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारताची गरुडझेप : आता पाकिस्तान-चीनच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर!

नवी दिल्ली: 'ऑपरेशन सिंदूर'मधील यशानंतर भारताने आता मोठी कंबर कसली आहे! शत्रू देशांच्या मनात धडकी भरेल अशी एक

भारत-पाक सीमेवर आढळले दोन मृतदेह, पाकिस्तानी सिम-ओळखपत्रे जप्त

जयपूर: राजस्थानमधील जैसलमेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर एक अल्पवयीन मुलगी आणि एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण, पुढील पाच दिवस पावसाचे

मुंबई (प्रतिनिधी) : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी, २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी