महामार्ग बांधणीतून नागपूरच्या प्रगती- विकासाचा मार्ग सूकर : नितीन गडकरी

नागपूर (हिं.स) : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री- नागपूरचे खासदार नितीन गडकरींनी रविवारी धापेवाडा परिसर व एकूणच नागपूर जिल्ह्यात आधुनिक रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी धापेवाडा, नागपूर येथे २८.८८ किमी लांबीच्या व ७२० कोटी रु. किंमत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४७-ई च्या सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शन चौपदरीकरणाचे लोकार्पण केले. यावेळी खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, विठ्ठल मंदिराचे विश्वस्त तसेच अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थित होते.


ट्वीटर द्वारे माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले,


"सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शनच्या चौपदरीकरणामुळे परिसरातील अदासा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिर व धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागा नदीवरील नवीन ४-लेन पुलामुळे धापेवाडा येथील ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल व प्रवास सुरक्षित होईल. प्रदेशातील कृषी व स्थानीय उत्पादनांची मोठ्या बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुलभ होईल.


६.२ किमीच्या ग्रीनफिल्ड कळमेश्वर बायपासमुळे कळमेश्वर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल. महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, व्हेईक्युलर अंडरपास, उड्डाणपुल व ओव्हरपासच्या प्रावधानांमुळे परिसरातील वाहतूक सुरळित व सुरक्षित होण्यास मदत होईल. गोंडखैरी व चिंचभवन भागातील लॉजिस्टिक व इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वृद्धी होईल. तसेच भोपाळ, इंदोर येथून मुंबई, हैदराबाद ला ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीपासून नागपूर शहराला मुक्तता मिळेल. नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल व वेळेची बचत होईल.


आजच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गोंडखैरी ते सावनेर सेक्शनमध्ये लाईट लावण्यासाठी ९ कोटी रुपये तसेच पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधणीतून नागपूर जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाचा मार्ग सूकर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या