पुणे : जुलैच्या पहिल्या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. आता पुन्हा एकदा पुढील ३ ते ४ दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार सरीसह पाऊस पडणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस मेघगर्जनेसह दमदार एंट्री करण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक असणार आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1550412179576586240
पुढील तीन-चार दिवस पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने राज्यभर अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.