Sunday, July 6, 2025

पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर

पहिल्या फेरीत द्रौपदी मुर्मू आघाडीवर

नवी दिल्ली : पहिल्या फेरीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवा यशवंत सिन्हा यांना अवघे २०८ मतं मिळाले आहेत. तर या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अवैध ठरली आहेत.


राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी म्हणजेच आज २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजल्यापासून संसद भवनात मतमोजणीला सुरूवात झाली आहे.


या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील. १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २१ जुलै रोजी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. त्यानंतर २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा