नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कार्यालयात चौकशी चालू आहे. मात्र यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी उग्र आंदोलन छेडले आहे.
सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस नेते आणि खासदारांनी अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा काढला आहे. तसेच पटना, बिहारमध्येही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.