केडीएमसी अग्निशामक दलात महिला कर्मचारी कार्यरत

कल्याण : बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलात देखील प्रथमच बाहय यंत्रणेद्वारे १५ महिला अग्निशामक कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आल्या असून या १५ अग्निशामक महिला कर्मचारी आता आपत्ती काळात नागरिकांच्या मदतीसाठी इतर अग्निशमन अधिकाऱी / कर्मचारी यांच्या समवेत सज्ज राहणार आहेत.


या अग्निशामक महिला कर्मचारी सदयस्थितीत टिटवाळा, आधारवाडी, कल्याण (प), डोंबिवली (प) येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत राहणार आहेत. विविध आपत्तीचे प्रसंगी नागरिकांना प्राधान्याने मदत करण्यात महापालिकेचे अग्निशमन पथक नेहमीच अग्रेसर असते. यामध्ये आता महिलांना देखील अग्निशामक या पदावर कार्यरत ठेऊन महापालिकेने महिलांप्रती प्रगतीचे नवे दालन खुले केले आहे.


महापालिकेची आधारवाडी कल्याण पश्चिम, टिटवाळा पूर्व, कल्याण पूर्व, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम या पाच ठिकाणी अग्निशमन केंद्र कार्यरत असून आता डोंबिवलीतील पलावा परिसरातही अग्निशमन विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे. या अग्निशमन केंद्राचा फायदा आपत्तीचे वेळी नजीकचा ग्रामीण परिसर, २७ गावे यांना होईल, अशी माहिती महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची आर्थिक झेप अभिमानास्पद

मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान स्वर्गीय दिघे साहेबांची परंपरा

कल्याण - डोंबिवलीत मतदानापूर्वीच कमळ फुललं: भाजपाची विजयाची हॅट्रिक

ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असली, तरी मतदानापूर्वीच भाजपाला मोठे यश

ठाण्यात गावदेवी मातेचा पालखी सोहळा

ठाणे : ठाणे पूर्व भागातील आई चिखलादेवी (गावदेवी) मातेचा पालखी सोहळा पौष पौर्णिमेमध्ये दिनांक ०२ जानेवारी २०२६

मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक

युतीसाठी शिवसेनेकडून २४ तासांचा अल्टिमेटम भाईंदर : मीरा–भाईंदर महापालिका निवडणूक युतीसंदर्भात शिवसेना आणि

ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

कडोंमपा निवडणुकीसाठी महायुतीत धुसफूस

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघडकीस