'एनआयए'चा बिहारच्या मदरशावर छापा, एकाला अटक

मोतिहारी (हिं.स.) : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बिहारच्या पूर्वी चंपारण जिल्ह्यातील जामिया मारिया निस्वा मदरशावर छापा टाकला आणि एका शिक्षकाला अटक केली. असगर अली असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पाटणा येथे नेण्यात आले आहे. यासोबतच एनआयएने आणखी दोघांना ताब्यात घेतले होते. परंतु, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले.


पटना येथील फुलवारी शरीफ परिसरातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) अतहर परवेझ आणि मोहम्मद जल्लाउद्दीन यांना अटक केल्यानंतर तपास पूर्व चंपारण जिल्ह्यातही पोहोचला आहे. या प्रकरणाच्या तपासात चकिया येथील रियाजचे नाव समोर आल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भाग सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आले. एनआयएचे दोन पथक मोतिहारी येथे पोहोचले. एनआयएच्या पहिल्या पथकाने मदरशातील शिक्षकाची चौकशी करून त्याला अटक केली, तर इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. लॅपटॉपचीही तपासणी करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले.


एनआयएची दुसरी टीम पलानवा पोलीस स्टेशन हद्दीतील गड सिसवानिया गावात असगर अलीच्या घरी पोहोचली. यावेळी रक्सौलचे डीएसपी आणि इतर पोलिस अधिकारी देखील एनआयएच्या पथकासोबत होते. यावेळी पुस्तकांनी भरलेल्या पाच बॅगा एनआयएने जप्त केल्या. बिहार पोलिसांनी अलीकडेच अतिरेकी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) काही दुवे असलेल्या संभाव्य दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला होता. तसेच भारतविरोधी कारवायांमधील सहभागाबद्दल पटनाच्या फुलवारी शरीफ परिसरातून दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर आणखी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची संख्या पाच झाली आहे. यातील एका आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांनी लखनऊ येथून अटक केली आहे.


अटक केलेल्यांमध्ये झारखंडचे निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद जल्लाउद्दीन आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचे (सीमी) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एसडीपीआय) सदस्य देखील आहेत. फुलवारीशरीफचे एसएसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, एकूण २६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पुन्हा एकदा आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे

नवी दिल्ली :  आर्यन खान विरोधात झालेल्या चर्चित ड्रग्ज प्रकरणात तपास करणारे नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई

निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी १२ पर्यायी ओळखपत्रे मंजूर

नवी दिल्ली  : देशभरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे निर्देश जारी केले

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर