नवी दिल्ली (हिं.स) : विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोविड १९ प्रतिबंधक लस मात्रांचा २०० कोटीचा टप्पा पार केल्याबद्दल देशवासीयांचे कौतुक केले.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” भारताने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. कोविड प्रतिबंधक लस मात्रांचा २०० कोटींचा विशेष टप्पा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन.
भारताची लसीकरण मोहीम इतक्या वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांबद्दल मला अभिमान वाटतो. या लसीकरण मोहिमेमुळे कोविड -19 विरोधातला जागतिक लढा आणखी मजबूत व्हायला मदत होईल.
संपूर्ण लसीकरण प्रक्रियेत देशवासीयांनी विज्ञानावर आपला विश्वास दाखवला. आपले डॉक्टर, परिचारिका, पहिल्या फळीतले कर्मचारी, वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक यांनी सुरक्षित भूमी ठेवण्यात मोठे योगदान दिले.मी त्यांच्या धैर्याचं आणि अथक परिश्रमाचे कौतुक करतो.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…