पाकिस्तानातील कराचीत इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग

कराची : इंडिगो विमानाचे पाकिस्तानातील कराचीत लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान शारजाहून हैदराबादला जात होते, असे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडीमुळे विमान उतरवण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती मिळाल्यानंतर, क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.


दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचे हे दुसरे एमर्जन्सी लँडिंग आहे. इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा-हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. या विमानातील प्रवाशांना हैदराबाद येथे जाण्यासाठी एका अतिरिक्त विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.


यापूर्वी स्पाईसजेटच्या बोईंग ७३७ विमानात बिघाड झाल्यानंतर ५ जुलै रोजी कराचीमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. या बिघाडानंतर विमानाला पाकिस्तानातील कराचीत उतरावे लागले. स्पाईसजेटच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला नेण्यात आले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. इंजिनला कंपन आल्यानंतर हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Comments
Add Comment

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर