पुणे (हिं.स.) : राष्ट्रीय पातळीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ २०२२ ची क्रमवारी जाहीर झाली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठांच्या क्रमवारीत बाराव्या स्थानावर आहे.
केंद्र सरकारच्या मनुष्यबळ व विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क’ कडून दरवर्षी शैक्षणिक संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. विविध विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांचे विविध निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही क्रमवारी जाहीर केली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे गेली काही वर्षे सातत्याने वरच्या क्रमांकावर असून राज्यातून देशपातळीवर आघाडीवर असणारे राज्यातील पाहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एकूण गुण ५९.४८ असून मागील वर्षी ही गुणाची आकडेवारी ५८.३४ होती. महाराष्ट्रात २०२० व २०२१ मध्ये कोविड १९ ची दुसरी लाट असतानाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपली संशोधनातील गुणवत्ता, उद्योग आणि शिक्षण सहकार्य, विदयार्थ्यांना रोजगाराच्या संधी तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवलेले धातूचे अडथळे (बॅरिकेड्स) जोरदार वाऱ्यामुळे कोसळल्याने एक…
नवी दिल्ली : दिल्लीत उष्णतेने होरपळलेल्या विद्यापीठाच्या वर्गखोल्यांमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाच्या लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या…
मुंबई : महाराष्ट्र शासन आणि आयबीएम यांच्यात मुंबईतील मंत्रालयात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे प्रशासनात अमुलाग्र…
मुंबई : 'ज्वेल थीफ' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत एक…
मुंबई : रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी बुधवारी…
ठाणे : महाराष्ट्रात मराठीच्या गळचेपीच्या घटनांची मालिका काही थांबेना. ठाण्यातील इंग्रजी शाळांमध्ये मराठी बोलण्यावर बंदी…