खासदार गावितांसह पालघर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात

Share

पालघर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शुक्रवारी रात्री, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांच्यासह आमदार श्रीनिवास वनगादेखील उपस्थित होते. शिवसेनेला हा मोठा धक्का आहे.

आमदार श्रीनिवास यांच्या सोबत काल रात्री उशिरा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित, पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम, मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यासह जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी नगरपरिषदचे सर्व नगरसेवक, पालघर जिल्हा परिषदेचे सहा सदस्य, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, काही महिन्यांपूर्वी बहुजन विकास आघाडीतून शिवसेनेत दाखल झालेले वसई-विरारचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह जवळपास ५० ते ६० शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामिल झाले.

जिजाऊ संघटनाही शिंदे गटासोबत

पालघर जिल्ह्यातील जिजाऊ संघटनाही शिंदे गटासोबत असल्याचे दिसून आले. या वर्षी जिजाऊ संघटनेने विक्रमगड, तलासरीसह इतर तालुक्यात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना चांगले यश मिळाले होते. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि पदाधिकारी शिंदे गटात सामिल झाले आहेत.

Recent Posts

Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…

10 minutes ago

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

2 hours ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

3 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

3 hours ago