पोटाची खळगी भागविण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली निवारा

  72

पारस सहाणे


पालघर : कातकरी कुटुंब चार महिन्यांपासून पोटाच्या खळगीसाठी कचऱ्यात झोपत आहे. जव्हार नगर परिषद हद्दीतील डम्पिंग ग्राऊंडमध्येच छोटेसी झोपडी बनवून डम्पिंगच्या कचरा कुंडीत आदिवासी कातकरी समाजाचे सदु सखाराम नडगे, त्यांची पत्नी संगीता नडगे, मुलगा रमन नडगे, मुली सानीका नडगे, रसीका नडगे हे कुटुंब मागील चार महिन्यांपासून वास्तव करीत आहे. ही बाब शिवसेनेचे पालघर जि. प. चे सदस्य प्रकाश निकम व सारिका निकम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने प्रशासनाची कानउघाडणी करत नडगे कुटुंबाचे स्थलांतर करण्यासाठी व्यवस्था करून दिली. निकम दाम्पत्य शुक्रवारी (दि. १५ जुलै) मोखाडा ते पालघर जिल्हा परिषद कार्यलयात कामानिमित्त निघाले होते.


दरम्यान जव्हारच्या बायपास रोडवर जव्हार नगर परिषदेचे कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड आहे. यात त्यांच्या नजरेस एक व्यक्ती भरपावसात तेथील प्लास्टिक कचरा व भंगार शोधून जमा करत होता. त्याच्यासोबत त्याचा मुलगा व दोन लहान मुली त्यांना मदत करत होते. निकम यांनी तातडीने आपले वाहन तेथे थांबवून कुटुंबाची विचारपूस केली. त्यांना चांगल्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या व कुटुंबाला अन्न धान्य व कपडे खरेदीसाठी आर्थिक मदत देखील करत, माणुसकी दाखवली. यावेळी महादेव नडगे यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी भंगार जमा करत असल्याची माहिती दिली. हे कुटुंब डम्पिंग ग्राऊंडच्या घाणीतच एका कच्च्या झोपडीत राहत होते.


या रस्त्याच्या शेजारून जाणाऱ्या व्यक्तीला डम्पिंग ग्राऊंडच्या उग्र वासाने उलटी होईल अशी अवस्था असतांना मात्र एका आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंब इतक्या घाणीत कसे राहत असेल असा प्रश्न निर्माण होत आहे. हाकेच्या अंतरावर आदिवासी विकास विभागाचे कार्यालय आहे, या कार्यालयातून आदिवासी बांधवाकरिता करोडो रुपयांचा निधी त्यांच्या विकासावर, उदरनिर्वाहावर, मुलांच्या शिक्षणावर उपलब्ध करून दिला जातो. मात्र हे दुर्दैव पाहिल्यानंतर हा पैसा कुठे जातो असा सवाल आता उपस्थित होत आहे.


हाकेच्या अंतरावर आदिवासी विकास विभागाचे कार्यालय


येथून हाकेच्या अंतरावर आदिवासी विकास विभागाचे कार्यालय आहे, या कार्यालयातून आदिवासी बांधवाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी त्यांच्या विकासावर, उदरनिर्वाहावर, मुलांच्या शिक्षणावर उपलब्ध करून दिला जातो. मात्र हे दुर्दैव पाहिल्यानंतर हा पैसा कुठे जातो?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


ही आदिवासी विकास विभागासाठी लाजिरवाणी घटना आहे. मी पीडित कुटुंबाला माझ्याकडून आर्थिक मदत दिलेली आहे, महादेवच्या मुलींना शिक्षण प्रवाहात आणू त्यांना घरकुल मंजूर करून देणे, जोपर्यंत हे कुटुंब मुख्य प्रवाहात येत नाही, तोपर्यंत त्याची सर्वस्वी जबाबदारी मी वैयक्तिक घेत आहे. - प्रकाश निकम, जि. प. सदस्य, पालघर


या कुटुंबाचे तातडीने आम्ही स्थलांतर करत आहोत. कुटुंबाला तातडीने रेशन कार्ड देण्यात येईल. तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांना या आदिवासी कातकरी कुटुंबाची माहिती देऊन योग्य ती उपाययोजना करण्यात येईल. - आशा तामखडे, तहसीलदार, जव्हार

Comments
Add Comment

कंपनी अस्तित्वात नाही, संचालकही तुरुंगात!

औषध निर्मितीचा धंदा मात्र जोरात गणेश पाटील विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या सातिवली महिला व बालसंगोपन

आधुनिक मत्स्यपालनावर विशेष कार्यशाळा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम

जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण निघणार

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली लोकसंख्येची माहिती पालघर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती

देहरजे नदीवरील पुरात अडकलेल्या मुलाला वाचवण्यात यश

शीळ, देहर्जे गावातील नागरिकांची घटनास्थळी धाव विक्रमगड : देहर्जे-शीळ गावाला जोडणाऱ्या देहरजे नदीवरील पुल पार

पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट!

सात तालुक्यांत मुसळधार पाऊस पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये वसई वगळता इतर सात तालुक्यांमध्ये शुक्रवारी

दहीहंडी उत्सवासाठी एक खिडकी योजना

महानगरपालिका उतरविणार गोविंदा पथकांचा विमा विरार : दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या गोविंदांना महानगरपालिकेतर्फे