Friday, March 6, 2026

दुसरीच्या पुस्तकात आईवडिल झाले 'अम्मी-अब्बू' आणि वाघा झाला 'शेरखान'

दुसरीच्या पुस्तकात आईवडिल झाले 'अम्मी-अब्बू' आणि वाघा झाला 'शेरखान'

इस्लामीकरणाविरोधात संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार

कोटा : इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील दुसरीच्या पुस्तकात आई वडील ऐवजी अम्मी-अब्बू असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून इस्लामीकरण करण्यात येत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

राजस्थानमधल्या कोटा येथील शिव ज्योती कॉन्व्हेट स्कूलमध्ये दुसरीच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. या पुस्तकामध्ये इतरही अनेक उर्दू शब्दांचा उल्लेख कऱण्यात आला आहे. पालकांनी याबद्दल शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. शाळेत शिकवलेल्या या गोष्टींमुळे आता मुले रोज बिर्याणी मागू लागले आहेत, तसेच आपल्या आईवडिलांना अम्मी अब्बू म्हणायला लागले आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

इंग्रजीच्या या पुस्तकात वडिलांना अब्बू आणि आईला अम्मी म्हणावे असे शिकवले जात आहे. तर आजोबांचे नाव फारुख आणि लहान मुलांचे नाव आमीर दिले आहे. तर वाघाला शेरखान असे संबोधले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >