मुंबई : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवारी) शिवतीर्थवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या महिन्यात राज ठाकरेंवर हिपबोनची शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीस यांनी ठाकरेंची सदिच्छा भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. पण या भेटीच्या निमित्ताने राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. विशेषत: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची दाट शक्यता आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याआधी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने ते भाजपच्या बाजूने झुकल्याची चर्चा होतीच. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मत दिले होते. तर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांना कौतुक करणारे पत्र पाठवले होते.
यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यात मनसेला देखील वाटा मिळेल अशी चर्चा सुरू झाली होती.
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद दिले जाईल असे वृत्त समोर येत होते. राज्य मंत्रिमंडळात अमित ठाकरेंचा समावेश केला जाईल ही बातमी खोटी होती असे राज ठाकरे यांनी या भेटीत पुन्हा एकदा स्पष्ट केले.
अशाच आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…