कोलकाता : पश्चिम बंगालमधील बहुचर्चित कोळसा घोटाळा प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी अनुप मांझीच्या दोन साथीदारांची सुमारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या दोन साथीदारांची नावे जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत.
ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत सीबीआयनं 27 नोव्हेंबर 2022 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफाआयआर दाखल केला होता. त्यानुसार तपास सुरू झाला होता. दरम्यान, गुरुपाद मांझी यानं गुन्ह्यातून कमावलेले 89 कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल यानं 2017 ते 2020 दरम्यान अनुप माजीच्या लोकांना 58 कोटींहून अधिक रक्कम दिली असल्याची माहिती ईडी चौकशीतून समोर आली आहे. या करावाईत ईडीने या दोन आरोपींच्या 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीने 56 ठिकाणी छापे टाकले होते. यासोबतच 181 कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीनं विकास मिश्रा, अशोक मिश्रा आणि गुरुपद मांझी यांनाही अटक केली आहे.
ग्रुप अगा माझीमध्ये कोलकाताच्या 6 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 104 कोटी रुपयांच्या गुन्ह्याची रकमेची अफरातफरी केली असल्याचा आरोप मंडल आणि मांझी यांच्यावर आहे. या रकमेचा वापर करुन या दोघांनी जंगम स्थावर मालमत्ता जमा केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी हेही ईडीच्या रडारवर आले होते. ईडीकडून अनेकदा त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.