बच्चे की जान लोगे क्या; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर खोचक ट्वीट

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारे मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या प्रकरणी आंदोलन केले होते. दरम्यान आता हे आंदोलन आदित्य ठाकरे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता खोचक शब्दात त्यांच्यावरक टीका केली आहे.


आरे आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बाळ असल्याच्या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1546479176227733512


या राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हणाले की, "बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! असा अन्याय मान्य नाही, बच्चे की जान लोगे क्या!" राणे यांनी यासोबत आयोगाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

Comments
Add Comment

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.

मुंबईकरांना प्रशिक्षित करण्यासाठी अग्निशमनचा अग्निरक्षक कार्यक्रम सुरू

मुंबई : मुंबईची आपत्कालीन सज्जता आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बहिणींची महाआरती

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे सोमवार ९ फेब्रुवारीला राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये

वेगवान मेट्रो, पण मोबाईल बंद! अ‍ॅक्वा लाईनवर प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो (मेट्रो-३) सध्या प्रवाशांसाठी

Ameet Satam: मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणार

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी फुंकला शंख मुंबई (विशेष प्रतिनिधी) "४४ वर्षांनंतर भाजपाचा महापौर मुंबईच्या