केंद्र सरकारचे क्रीडा विभागाच्या योजनांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने क्रीडा विभागाच्या योजनांसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलने रोख पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच खेळाडू आणि प्रशिक्षकांना इतर लाभ मिळवणे सोपे आणि पारदर्शक केले आहे. पात्र खेळाडू आणि खेळाडूंना यापुढे त्यांचे अर्ज संबंधित क्रीडा महासंघांमार्फत पाठवण्याची आणि निकालाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. ते आता त्यांच्या पात्रतेनुसार dbtyas-sports.gov.in या वेब पोर्टलवर थेट अर्ज करू शकतात. एखादी क्रीडा स्पर्धा संपल्यापासून ६ महिन्यांच्या आत, संबंधित खेळाडू रोख पुरस्कार योजनांसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन पोर्टलवर त्यासाठी रिअल टाइम ट्रॅकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.


या पोर्टलचा वापर क्रीडा मंत्रालयाच्या तीन प्रमुख योजनांसाठी अर्ज भरण्यासाठी करता येऊ शकतो. उदा. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पदक विजेते आणि त्यांच्या प्रशिक्षकांसाठी रोख पुरस्कार योजना, खेळाडूंसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कल्याण निधी आणि गुणवंत खेळाडूंसाठी पेन्शन योजना. या शिवाय सरकारने नुकतेच डेफलिंपिकमधील खेळाडूंसाठीही निवृत्तिवेतनाचे लाभ घोषित केले आहेत. सर्व तिन्ही योजनांसाठीची पडताळणी प्रक्रिया अत्यंत सुलभ करण्यात आली आहे. जेणेकरून प्रक्रियांसाठीचा कालावधी कमी होऊ शकेल. क्रीडा प्राधिकरणांच्या माध्यमातून जुन्या पद्धतीने आवेदने भरणे आणि त्यांची मानवी पद्धतीने छाननी करण्यात यासाठी बराच वेळ लागत असे. कधीकधी तर या छाननी आणि मंजूरी प्रक्रियेत १-२ वर्षे निघून जात.


हा उपक्रम अत्यंत क्रांतिकारक असल्याचे केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. या नव्या उपक्रमामुळे, या सगळ्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि दायित्वभावना वाढेल, असेही ते म्हणाले. नवे पोर्टल थेट लाभ हस्तांतरण- 'डीबीटी-एमआयएस'शी जोडण्यात आले असून, यामुळे निधी थेट खेळाडूंच्या खात्यात जमा करता येईल. यामुळे, थेट लाभ हस्तांतरण अभियानामागचे केंद्र सरकारचे उद्दिष्टही पूर्ण होईल.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे