वयाच्या ९४व्या वर्षी जागतिक स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

फिनलँड : जर तुमच्या आत काहीतरी करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी वयाची मर्यादा नसते. ९४ वर्षीय भगवानी देवी डागर यांनी असेच काहीसे सिद्ध केले आहे. ज्या वयात माणसांना नीट हालचाल करता येत नाही, त्या वयात भगवानी देवी यांनी परदेशात भारताची डंका वाजवली आहे. मूळची हरियाणाची असलेली भगवानी देवी आता वयाच्या ९४ व्या वर्षी जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण आणि दोन कांस्यपदक जिंकून जगासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


फिनलँड मध्ये सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२’ भगवानी देवी यांनी ज्येष्ठ नागरिक गटात १०० मीटर अंतर २४.७४ सेकंदात पार केले. याशिवाय त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. तिथेही त्यांनी कांस्य पदक मिळविले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचे भरपूर कौतुक होत आहे. त्यांच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला लोकांनी सलाम केला आहे.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.