अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ, ४० भाविक अजूनही बेपत्ताच

जम्मू (हिं.स.) : गेल्या ८ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीनंतर स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारी पुन्हा सुरूवात झाली. जम्मू बेस कॅम्पमधून सकाळी भविकांचा गट पवित्र अमरनाथ गुफेच्या दर्शनासाठी रवाना झाला परंतु, ढगफुटीच्या घटनेत बेपत्ता झालेल्या ४० भाविकांचा अद्याप शोध लागलेला नाही.


अमरनाथ गुहेजवळ ८ जुलै रोजी ढगफुटी होऊन पूर आला होता. या दुर्घटनेत १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून अद्यापही सुमारे ४० जण बेपत्ता आहेत. तर जखमी लोकांना एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींवर उपचार सुरु आहेत. या ठिकाणी अद्यापही बचावकार्य सुरुच असून रडार यंत्रणेद्वारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. यासंदर्भात सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्याकडून ४ हजार रडार लावण्यात आले आहेत. यामुळे ढिगाऱ्याखाली अडकललेल्या लोकांचा शोध घेण्यात मदत होणार आहे.


दरम्यान ढगफुटीमुळे स्थगित करण्यात आलेली यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली आहे. सोमवारी सकाळीच जम्मू येथील बेस कँम्पमधून यात्रेकरु अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याआधी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बेस कँम्पची पाहणी करत यात्रेकरुंसोबत संवाद साधला. यावेळी त्यावेळी यात्रेकरुंना योग्य सुविधा पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय