भंडारा (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) येथे घडली आहे.
हा ट्रक नागपूर कडे जात असताना मागून येत असलेल्या ट्रक ने मागील बाजूने धड़क दिली, ही धडक इतकी जोरदार होती कि ट्रक मधील लोहा कॅबिनला चिरत बाहेर निघाला, हा अपघातात क्लीनर रोहीत हिरालाल पटेल वय २२ वर्षे, मुरारी दिलीप सिंग वय २८ वर्षे, दोन्ही रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला व चालक शत्रोहन प्रभु प्रसाद वय ३० वर्षे रा. गोपालगंज बिहार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.
या अपघातामुळे काही तास वाहतूक कोलमडली होती. नंतर दोन्ही ट्रकला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…
मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा…