मुंबई : “आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है…..!”, असे ट्वीट करत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेविरोधात खोचक टीका केली आहे. यासोबतच त्यांनी #संपलेलापक्ष हा हॅशटॅगही वापरला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत आता ठिकठिकाणी मोठमोठे खिंडार पडत आहेत. आमदार, नगरसेवकांनतर आता खासदारांनीही बंडाचा पावित्रा घेतला आहे. यामुळे खडबडून जागे झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र, युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
यानिमित्त आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला कालपासून म्हणजेच ८ जुलैपासून सुरुवात झाली आहे. मात्र आज राष्ट्रीय दुखवटा असल्याने वरळीत होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…