चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता विक्रम याची तब्येत अचानक बिघडली आहे. विक्रमला तात्काळ चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
विशेष म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विक्रमची प्रकृती खालावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी विक्रमची तब्येत अचानक बिघडली. यानंतर विक्रमला रुग्णालयात नेण्यात आले. विक्रमला एक दिवसापासून छातीत दुखत असल्याची तक्रार होती. मात्र शुक्रवारी त्याची प्रकृती बिघडली. बातमी ऐकून सोशल मीडियावर चाहते विक्रम लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. विक्रम हे नाव दाक्षिणात्य सिनेमातील निवडक कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
विक्रमच्या प्रकृतीनंतर त्याच्या आगामी चित्रपटांची चर्चा सर्वत्र रंगली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य सिने दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट वन’ या चित्रपटात विक्रम दिसणार असल्याची माहिती आहे. अलीकडेच विक्रमचा लूक पोनियिन सेल्वनने उघड केला होता. या चित्रपटात विक्रमसोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील प्रमुख भूमिकेत आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…