अमरावतीत जामडोल येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

अमरावती (हिं.स.) : अमरावती तालुक्यातील माहूली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जामडोल शेतशिवारात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पाऊस पडला, यात शेतात काम करत असलेल्या ६ जणांच्या अंगावर वीज पडली, यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर यात चार जण सुखरूप बचावले. मृतकांमध्ये किशोर भगवान पाटील आणि अविनाश श्यामराव निबोंरकर यांचा समावेश आहे.


प्राप्त माहितीनुसार शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता सदर प्रकार घडला, मृतक शेतकरी किशोर पाटील हे जामडोल येथे बऱ्याच वर्षा पासून शेती मक्ताने वाहीत होते, नेहमी प्रमाणे ते आपल्या शेतात मजूर घेऊन गेले होते, पाऊस आल्याने झाडाच्या आडोशाला सर्व सहाही जण थांबले असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ही घटना घडली, तर यात एक जण किरकोळ जखमी सुध्दा झाला, घटनास्थळी माहूली जहागीर पोलीस व महसूल कर्मचारी दाखल झाले होते.

Comments
Add Comment

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या

Pravin Darekar : अभियांत्रिकीच्या 'डिस्टन्स' पदव्या अवैध; तरीही महापालिकेत पदोन्नत्या कशा? आमदार दरेकरांचा सवाल

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेल्या १० वर्षांत परराज्यातील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे देण्यात

NCMC Smart Card : एसटीच्या 'NCMC स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; आठवड्याभरातच १ लाखाचा टप्पा पार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल