रोहित शर्माच्या विश्वविक्रमाला ३ वर्षे पूर्ण!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमध्ये तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला होता. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने इतिहास रचला होता. या विश्वचषकात ६ जुलै २०१९ मध्ये श्रीलंकाविरुद्ध साखळी सामन्यात रोहित शर्माने पाचवे शतक ठोकून विश्वविक्रमाला गवसणी घातली होती. रोहितच्या या विश्वविक्रमाला बुधवारी ३ वर्षे पूर्ण झाली.


दरम्यान, २०१९ मध्ये एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा नावाने कमालीची गोलंदाजी केली होती. या विश्वचषकात त्याने पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध १४० धावा, इंग्लंडविरुद्ध १०२ धावांची खेळी, बांग्लादेशविरुद्ध १०४ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध १०३ धावांची खेळी करत विश्वविक्रम रचला होता.


या कामगिरीसह रोहित शर्माने श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला. संगकाराने २०१५ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ४ शतके झळकावली होती.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा